योगविद्येचा धर्माशी संबंध नाही: नायडू

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली: योगविद्येचा धर्माशी काहीही संबंध नाही. तरी काही जण या प्राचीन विद्येला धर्माला रंग देत असतील, तर माणुसकीला तो मोठा धोका आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी मंगळवारी केले.

नवी दिल्ली: योगविद्येचा धर्माशी काहीही संबंध नाही. तरी काही जण या प्राचीन विद्येला धर्माला रंग देत असतील, तर माणुसकीला तो मोठा धोका आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी मंगळवारी केले.

योगविद्येच्या क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन होण्याची गरज व्यक्त करून नायडू म्हणाले, की योग म्हणजे स्वास्थ्यविज्ञान असून अन्य वैद्यकीय शाखांप्रमाणेच याचा अभ्यास व सराव करणे महत्त्वाचे आहे. योगाचा धर्माशी अजिबात संबंध नाही. मात्र दुर्दैवाने काही जण या प्राचीन विज्ञानप्रणालीची सांगड धार्मिकतेशी घालतात. असे करण्यामुळे माणुसकीला ते हानी पोचवत आहे, अशी टीका नायडू यांनी केली. शारीरिक व्यायाम, मानसिक स्वास्थ्य, आध्यात्मिक मदतनीस अशा अनेक गोष्टींची जननी योगाभ्यास आहे. वैद्यकीय खर्च कमी राखण्यासही योग मदत करते, असे ते म्हणाले.

योगाभ्यासाविषयी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत नायडू बोलत होते. योगाला घराघरांत पोचविल्याबद्दल योगगुरू रामदेवबाबा यांचे त्यांनी कौतुक केले, तसेच आयुष मंत्रालयाचे सचिव व आरोग्य सचिव सी. के. मिश्रा यांनी "आयुष' मंत्रालयाची लोकप्रियता वाढविली, तर त्यांचे आरोग्यावरील खर्च कमी होईल, अशी खोपरखळी नायडू यांनी मारली.

Web Title: new delhi news Yogvidya does not belong to religion: Naidu