रेल्वेच्या खाडेबहाद्दरांची लवकरच गच्छंती

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली: परवानगीविना दीर्घकाळ कामावर गैरहजर राहणाऱ्या 13 हजार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया रेल्वे मंत्रालयाने सुरू केली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आदेशानुसार या कर्मचाऱ्यांवर ही शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
 
या प्रकरणी रेल्वेच्या विविध भागांत केलेल्या पाहणीत सुमारे 13 लाख कर्मचाऱ्यांपैकी 13 हजार कर्मचारी अनधिकृतरीत्या दीर्घकाळ सुटीवर असल्याचे आढळून आले. रेल्वे विभागाची कार्यक्षमता आणि कामगिरीत सुधारणा करणे, तसेच प्रामाणिक व मेहनती कर्मचाऱ्यांचे नीतिधैर्य वाढविण्याच्या उद्देशाने या खाडेबहाद्दरांना कामावरून कमी करण्यात येणार आहे, असे रेल्वेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ते आदेशही रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांना व पर्यवेक्षकांना देण्यात आले आहेत.

Web Title: new delhi railway employee on leave action piyush goyal