
नव्या प्रायव्हसी धोरणामुळे सगळ्यांच्याच चिंता वाढल्या आहेत. यामुळे यूजर्संचे पर्याय आणि त्यांच्या स्वायत्ततेवर देखील मर्यादा येणार आहेत. व्हॉट्सॲपने हे प्रस्तावित धोरण मागे घ्यावे.
नवी दिल्ली - व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपने व्यक्तीगतता धोरणाची (प्रायव्हसी पॉलिसी) अंमलबजावणी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली असली तरीसुद्धा भारत सरकारने त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. व्हॉट्सॲपकडून केले जाणारे एकतर्फी बदल योग्य नसून ते स्वीकारार्ह देखील नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक मंत्रालयाने व्हॉट्सॲपचे सीईओ विल कॅथकार्ट यांना या संदर्भात एक पत्र लिहिले असून त्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.
विवाहबाह्य संबंध लिव्ह-इन-रिलेशनशिप ठरु शकत नाही, तो गुन्हाच- हायकोर्ट
व्हॉट्सॲपचा भारतातील यूजरबेस हा सर्वांत मोठा असून या सेवेसाठीचे हे जगातील सर्वांत मोठे मार्केट देखील आहे. नव्या प्रायव्हसी धोरणामुळे सगळ्यांच्याच चिंता वाढल्या आहेत. यामुळे यूजर्संचे पर्याय आणि त्यांच्या स्वायत्ततेवर देखील मर्यादा येणार आहेत. व्हॉट्सॲपने हे प्रस्तावित धोरण मागे घ्यावे. माहितीची गोपनीयता, पर्यायांचे स्वातंत्र्य आणि भारतीय नागरिकांची स्वायत्ता याबाबत कंपनीने आपल्या धोरणामध्ये बदल करावेत, कंपनीकडून भारतीयांचा योग्य मान ठेवला जावा असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान व्हॉट्सॲपच्या या नव्या धोरणावर अनेक नेटीझन्सनी चिंता व्यक्त करताना यामुळे आमचा खासगीपणा धोक्यात येईल अशी चिंता व्यक्त केली होती.
Corona Update : गेल्या 24 तासांत भारतात 13,823 नवे रुग्ण; काल राज्यात 50...