

Bay of Bengal Low Pressure Area Maharashtra Rain Forecast
esakal
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहेत. आज (ता. ११) रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांना हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.