नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उद्या शपथविधी

Draupadi Murmu Latest Marathi News
Draupadi Murmu Latest Marathi NewsDraupadi Murmu Latest Marathi News

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला आहे. मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. मुर्मू यांचा सोमवारी शपथविधी पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. उद्या सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी त्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. (New President Draupadi Murmu will take oath tomorrow)

Draupadi Murmu Latest Marathi News
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवकरच सातारा दौऱ्यावर; ऐतिहासिक नगरीला भेट देणार

सत्ताधारी भाजप पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 3219 मते पडली, ज्यांचे मूल्य 838839 होते. यामध्ये द्रौपदी मुर्मू यांना 2161 मते (मूल्य 577777) आणि यशवंत सिन्हा यांना 1058 मते (मूल्य 261062) मिळाली.

Draupadi Murmu Latest Marathi News
भाजप प्रवक्त्याकडून सोनिया गांधीबद्दल अपशब्द; कॉंग्रेसची नड्डांकडे तक्रार

20 जून 1958 रोजी ओडिशाच्या मयूरगंज जिल्ह्यातील बैदपोसी गावात जन्मलेल्या द्रौपदी संथाल आदिवासी वांशिक गटातील आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. त्यांचा विवाह श्यामाचरण मुर्मू यांच्याशी झाला होता. द्रौपदी यांनी त्यांचा नवरा आणि दोन मुले गमावली आहेत. त्यांना इतिश्री मुर्मू नावाची मुलगी आहे.

त्यांचे बालपण अत्यंत वंचित आणि गरिबीत गेले. मात्र त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परिस्थिती आड येऊ दिली नाही आणि भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. द्रौपदी मुर्मू आपल्या मुलीसाठी शिक्षिका म्हणून काम करू लागल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com