स्वदेशी उपकरणानं ओमिक्रॉनचं निदान, टाटांच्या टेस्टिंग कीटला मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Testing-Kit

स्वदेशी उपकरणानं ओमिक्रॉनचं निदान, टाटांच्या टेस्टिंग कीटला मंजुरी

नवी दिल्ली : टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सने ओमीश्योर (Tata Medical and Diagnostics and is named OmiSure) नावाची टेस्ट किट विकसित केली असून, या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता मिळाली आहे. यामुळे कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron Testing Kit) टेस्टसाठी परदेशी कंपनीवरील अवलंबित्व संपुष्टात येणार आहे. या किटमुळे ओमिक्रॉनचे निदान त्वरित होण्यास मदत होणार असून रूग्णांवर त्वरित करता येणार आहेत. सध्या भारतात अमेरिकन कंपनी थर्मो फिशरचे (Thermo Fisher) टेस्टिंग किट ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी वापरले जात आहे. (ICMR Approved Kit To Detect Omicron)

ICMR ने गेल्या महिन्यात SARS-CoV-2 ओमिक्रॉन विषाणू (Omicron Variant) शोधणार्‍या रिअल-टाइम RT-PCR चाचणीसाठी तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी कंपन्यांकडून विविध पर्याय मागविले होते. तसेच 17 डिसेंबर रोजी या नवीन तंत्रज्ञानावर आधारित RT-PCR चाचणी किटच्या विकासासाठी आणि व्यापारीकरणासाठी कंपन्यांकडून निविदाही मागवण्यात आल्या होत्या. या तंत्रज्ञानाची मालकी ICMR कडे असेल, तर टाटा मेडिकल आणि डायग्नोस्टिक्स हे व्यावसायिकरित्या उत्पादन करणार आहे.

टाटा समूहाच्या कंपन्यांनी कोविड-19 विरुद्ध आतापर्यंत 2,500 कोटी रुपये खर्च केले आहेत. दुसऱ्या लाटेत टाटा स्टीलच्या (Tata Group Work In Covid waves ) कलिंगनगर प्लांटमध्ये ऑक्सिजनची (Oxygen Supply During Covid 19) कमतरता असताना मोठ्या प्रमाणावर द्रव ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. याशिवाय टाटा समूहाच्या कंपन्यांनी लाखो युनिट्स पीपीई किट आणि टेस्टिंग किटचादेखील पुरवठा केला आहे. देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे आतापर्यंत 1,892 रूग्णांची नोंद करण्या आली आहे, त्यापैकी 766 रूग्ण बरे झाले आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात नोंदविण्यात आली आहेत. त्यानंतर दिल्ली, ​​केरळ, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. (Omicron Cases In India)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top