ओमिक्रॉननंतर आता 'IHU' ची एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला नवा व्हेरियंट

नव्या व्हेरियंटमध्ये कोरोना लसींना अधिक प्रतिरोधाची आणि वेगानं संसर्गाची क्षमता
IHU: Corona New variant
IHU: Corona New variant

नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणावर म्युटेट होणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं जगात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. भारतात या व्हेरियंटमुळं तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. पण संशोधकांना आता ओमिक्रॉनपेक्षा अधिक वेगानं म्युटेट होणारा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यामुळं जगाच्या चिंतेत भर पडली आहे. (Entry of IHU after Omicron a new variant of covid found in France)

IHU: Corona New variant
ओमिक्रॉनची वाढती रूग्णसंख्या, राजधानी दिल्लीत विकेंड कर्फ्यू

IHU (B.1.640.2) असं या व्हेरियंटचं नाव असून IHU मेडिटेरनी इन्फेक्शन इन्स्टिट्यूटनं याचा शोध लागला. संशोधकांचं म्हणणं आहे की, या नव्या व्हेरियंटमध्ये ४६ म्युटेशन्स आहेत, जे ओमिक्रॉनपेक्षा अधिक आहेत. अधिक म्युटेशन्स असलेला हा IHU व्हेरियंट कोरोना प्रतिबंध लसींना अधिक प्रतिरोध करतो तसेच तो अधिक संसर्गजन्यही आहे, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.

IHU: Corona New variant
शाळांमधील 'सूर्य नमस्कार' वादाच्या भोवऱ्यात; मुस्लीम संघटनेचा विरोध

संशोधकांना फ्रान्समधील मार्सेलेस येथे IHU व्हेरियंटचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. अफ्रिकन देश कॅमेरुन येथील प्रवासाशी संबंधीत ही प्रकरणं आहेत. दरम्यान, असं असलं तरी सध्या ओमिक्रॉननं संपूर्ण जगभरात आपला प्रभाव टाकला आहे. पण आता IHU हा व्हेरियंट वेगानं पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण अद्याप B.1.640.2 इतर देशांमध्ये आढळून आलेला नाही किंवा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अद्याप याचा तपास सुरु असल्याचं कुठलंही शिक्कामोर्तब केलेलं नाही. (IHU: Corona New variant Updates)

IHU: Corona New variant
भारतानं चीनला दिलं सडेतोड प्रत्युत्तर; गलवानमध्ये फडकावला तिरंगा

दक्षिण अफ्रिकेत २४ नोव्हेंबर २०२१ रोजी आलेल्या एका कोविडच्या नमुन्यामध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत १०० देशांहून अधिक देशांमध्ये पसरला आहे. भारतात या व्हेरियंटची सुमारे १,९०० प्रकरणं आढळून आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com