आता लहान मुलांनाही हेल्मेट अनिवार्य; वाच काय आहेत नवे नियम
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (Ministry of Road Transport and Highways) दुचाकी चालकांसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दुचाकीवरून चार वर्षांखालील मुलांना (Baby On Bike) नेण्यासाठी नवीन सुरक्षा नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. हा नियम पुढील वर्षी म्हणजेच 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रालयाने मसुदा अधिसूचना जारी करून नियमात बदल करण्याचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये वाहनचालकांना सेफ्टी हार्नेस आणि क्रॅश हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव होता. याबाबत लाईव्ह हिंदुस्तानने वृत्त प्रकाशित केले आहे. ( Two Wheeler Rules Change)
वाहतूक मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या नवीन नियमानुसार दुचाकी चालकांना हेल्मेट (Helmet) आणि लहान मुलांसाठी हार्नेस बेल्ट (Harness belt) वापरणे बंधनकारक असणार आहे. तसेच वाहनाचा वेग केवळ 40 किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवणे आवश्यक असणार आहे. दुचाकींसाठी नव्याने लागू करण्यात आलेल्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 1000 दंड आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाऊ शकते.
नवीन नियमांनुसार, वापरलेले सुरक्षा हार्नेस (ब्लेल्ट) हलके, वॉटरप्रुफ, कुशनयुक्त आणि 30 किलो भार वाहून नेण्याची क्षमता असलेले असणे आवश्यक असणार आहे. त्याशिवाय प्रवासादरम्यान क्रॅश हेल्मेट किंवा सायकल हेल्मेट घालणे देखील आवश्यक असणार असून, हेल्मेट हे सरकारने नमुद केलेल्या मानकांचे असणे आवश्यक असणार आहे. केंद्राकडून मुलांसाठी हेल्मेट बनविणाऱ्या निर्मात्यांना यापूर्वीच सूचित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.