महायुद्ध टळले! रशियाची सीमेवरून सैन्य मागे घेण्याची घोषणा

महायुद्ध टळल्याने येथील युक्रेनमधील नागरिकांसह अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
Ukraine_Russia War Situation
Ukraine_Russia War SituationSakal
Updated on

Russia Ukraine Crisis : युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाने क्राइमियामधील लष्करी सराव संपल्याची घोषणा केली असून, यानंतर येथील सैनिक तेथून माघारी परतत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, युक्रेन आणि रशियामध्ये होणारे महायुद्ध टळल्याने येथील युक्रेनमधील नागरिकांसह अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. रशियाने एक दिवस आधीच युक्रेनच्या सीमेवरून आपले काही सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र, रशियाच्या या घोषणेवर अमेरिकेसह इतर देशांनी अविश्वास व्यक्त केला होता. (Russia Ukraine Crisis Latest News In Marathi )

Ukraine_Russia War Situation
Taliban: भारताला डिवचण्यासाठी लष्करी तुकडीला दिले 'पानिपत' नाव

विशेष म्हणजे एक दिवस आधी रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि जर्मन चांसलर यांची भेट झाली होती. त्यावेळी आम्हाला युद्ध नको असल्याचे स्पष्ट विधान रशियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केले होते. दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने (Russia Defense Ministry) बुधवारी एक व्हिडिओ जारी केला असून, त्यात क्राइमियामधून सैन्य माघार घेत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये टँक आणि लष्करी वाहने क्रिमियामधून बाहेर पडताना दिसून येत आहेत. तसेच सैनिकही त्यांच्या मुळ तळावर परतणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Ukraine_Russia War Situation
5 वर्षे, 28 बँका, 23 हजार कोटी कर्ज; ABG Shipyard ने कसा केला घोटाळा

बायडेन यांनी मागितले होते पुरावे

युक्रेनवर हल्ला करण्याचा आपला विचार बदलत असल्याचे विधान पुतिन यांनी मंगळवारी व्यक्त केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी पुतीन यांचा दावा मान्य करण्यास नकार देत 1.50 लाखांहून अधिक रशियन सैनिक अजूनही युक्रेनच्या सीमेजवळ तैनात असल्याचे म्हटले होते. तसेच रशियाकडे सैन्य मागे घेत असल्याचा पुरावा त्यांनी मागितला होता, त्यानंतर रशियाने हा व्हिडिओ जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com