वाढत्या कोरोनामुळे परदेशी प्रवाशांसाठी नवे SOP; 22 फेब्रुवारीपासून नियमांची अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 22 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजता नवे SOP लागू होणार आहेत.

नवी  दिल्ली : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 22 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजता नवे SOP लागू होणार आहेत. यूके, युरोप आणि मिडल इस्ट देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने विशेष नियम तयार केले आहेत. भारतात येणाऱ्या सामान्य आंतराराष्ट्रीय प्रवाशांसाठी जाहीर केलेल्या SOP चे दोन दोन प्रमुख भाग आहेत. प्रवासाच्या आधीचे नियम आणि विमानात बसण्याच्या आधीची तयारी असे हे दोन भाग आहेत. हे नियम पुढीलप्रमाणे आहेत.

 प्रवासाची तयारी
1. एअर सुविधा पोर्टलवर कोरोना झाला नसल्याचे सेल्फ डिक्लेरेशन देणे
2. 72 तासांपूर्वींचा RTPCR टेस्टचा रिपोर्ट ऑनलाइन जमा कर करावा लागेल.
3. भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या 14 दिवसांसाठी क्वारंटाईन अथवा सेल्फ क्वारंटाईनच्या नियमांचे पालव करण्याबाबतचे अंडरटेकींग
4. नातेवाईकांच्या मृत्यूच्या कारणासाठी सूट असेल. त्यासाठी 72 तासांपूर्वी ऑनलाइन एप्लिकेशन करावं लागेल.

हेही वाचा - सलग 10 व्या दिवशी इंधन दरवाढ; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा नवा उच्चांक
विमानात बसण्यापूर्वी
1. काय करायचे आहे आणि काय करायचे नाही, याची यादी तिकीटासोबत दिली जाईल.
2. एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरेशन आणि RTPCR रिपोर्ट जमा करावा लागेल.
3. थर्मल स्क्रीनिंगनंतर लक्षणे नसलेल्यांनाच प्रवासास परवानगी
4. आरोग्य सेतु ऍप मोबाईलमध्ये हवे
5. सॅनिटायझेशनची खबरदारी बाळगावी
6. प्रवासादरम्यान फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन
7. प्रवासादरम्यान मास्कचा वापर अनिवार्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New rules for international passengers on flights from UK, Europe & Middle East from February 22