esakal | सलग 10 व्या दिवशी इंधन दरवाढ; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा नवा उच्चांक
sakal

बोलून बातमी शोधा

petrol 100

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी पहिल्यांदाच हा शंभरीपार सर्वोच्च दर  गाठला आहे. 

सलग 10 व्या दिवशी इंधन दरवाढ; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा नवा उच्चांक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग दहाव्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. दररोज वाढत्या किंमतींमुळे नवनवे रेकॉर्ड बनत आहेत. कारण दररोजच्या नव्या वाढत्या किंमतींनी पेट्रोल आणि डिझेल आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च किंमतीला जाऊन पोहोचत आहेत. त्यामुळे हा नवा उच्चांक बनत आहे. तसेही देशातील अनेक भागात पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. लवकरच ही परिस्थिती संपूर्ण भारतात येईल, असं चित्र दिसून येत आहे. आज दहाव्या दिवशी डिझेलच्या किंमतींमध्ये 32 ते 34 पैशांनी वाढ झाली आहे तर पेट्रोलच्या किंमतींमध्ये आज 32 ते 34 पैशांची वाढ झाली आहे. 

दिल्ली आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांमधील या इंधनांचे भाव हे आतापर्यंतच्या सर्वोच्च स्थानावर आहेत. आज वाढलेल्या किंमतींनंतर दिल्लीतील पेट्रोलचा भाव 89.88 रुपये झाले आहे तर मुंबईमध्ये 96.32 रुपये पेट्रोल झाले आहे. तर दिल्लीमध्ये डिझेलचे भाव सध्या 80.27 रुपये आहे तर मुंबईमध्ये 87.32 रुपये झाले आहे.

अशा आहेत प्रमुख शहरांमधील किंमती  
शहर           डीझेल    पेट्रोल
दिल्ली          80.27    89.88
कोलकाता     83.86    91.11
मुंबई            87.32    96.32
चेन्नई            85.31    91.98