New Sansad Bhavan : नव्या संसद भवनाचं डिझाइन आहे एमपीच्या या मंदिरासारखं...

जुने संसद भवनदेखील एमपीच्या एका मंदिराच्या डिझाइनवर अवलंबून होतं.
New Sansad Bhavan
New Sansad Bhavanesakal

New Parliament Building Design: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनचे उद्घान झाले. या संसद भवनाचे डिझाइन मध्यप्रदेशातल्या एका प्रसिद्ध मंदिरासारखी आहे. असा दावा केला जातो की, प्रोजेक्टचं हे डिझाइन विदिशा च्या विजय मंदिराला बघून केलं होतं.

जुन्या संसद भवनचं निर्माणही मध्यप्रदेशच्या मुरैना चौंसठ योगिनी मंदिराच्या डिझाइनवर झाले आहे. याला ब्रिटीश आर्किटेक्ट एडविन लुटियंस यांनी बनवलं होतं. तर आता नव्या संसद भवनची निर्मितीही मध्यप्रदेशातल्या एका मंदिरावर आधारीत असल्याचा दावा केला जातो. पण याला सरकार कडून कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नाही.

ज्या मंदिरावर आधारीत हे नवे संसद भवन बनवण्यात आले आहे ते मध्यप्रदेशच्या विदिशीमध्ये आहे. इतिहासकारांच्या मतानुसार विजय मंदिर हे देशातल्या सर्वात विशाल मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर आक्रमकांनी अनेकदा लुटले आहे. विजय मंदिराच्या उंच बेसला बघून त्याचा आकार आणि संसद भवनची आकृती सारखीच दिसते.

ऐतिहासिक दस्ताएवजानुसार विजय मंदिर आक्रमकांद्वारे अनेक वेळा तोडले गेले आहे. महम्मद गोरीचे गुलाम अलतमश पासून ते औरंगजेबासारखे क्रूर शासकांनी आक्रमण केले आहे. पण पुन्हा पुन्हा याचे निर्माणही करण्यात आले. विजय मंदिराच्या मागे चार मनोरे दिसतात. विजय मंदिराचे बांधकाम चालुक्य वंशाच्या राजा विदिशाने त्याचा विजय चिरस्थायी व्हावा यासाठी येथे भेलीस्वामीन (सूर्य) मंदिर बांधले होते.

New Sansad Bhavan
New Sansad Bhavan : 5 दुर्मिळ योगांमध्ये पीएम मोदी यांनी केले नव्या संसद भवनचे उद्घाटन

10व्या आणि 11व्या शतकात परमार काळात परमार राजांनी त्याची पुनर्बांधणी केली. मुघल शासक औरंगजेबाने हे मंदिर पाडले होते. यानंतर ते मराठा राजांनी बांधले. देशाच्या सध्याच्या संसद भवनाची रचना मध्य प्रदेशातील मुरैना येथील चौसठ योगिनी मंदिरासारखी आहे, जी ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्सने बांधली होती.

आता नवीन संसद भवनाचे बांधकामही मध्य प्रदेशातील विजय मंदिरासारखेच आहे. म्हणजेच भारताच्या सर्वात शक्तिशाली इमारतीचा इतिहास स्वातंत्र्यापूर्वी मध्य प्रदेशशी जोडलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com