रेल्वेत मिळणार वाय-फाय, एलसीडी स्क्रीन व सर्वोत्तम जेवण

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

या सर्व सुखसोईयुक्त ही नवी प्रिमियर रेल्वे गाडी जून महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. 20 डबे असलेल्या तेजस एक्स्प्रेसला स्वंयचलित दरवाजे असतील. भारतात अशा प्रकारची रेल्वे प्रथमच धावणार आहे. सध्या भारतात फक्त मेट्रोला स्वयंचलित दरवाजे आहेत.

नवी दिल्ली - मुंबई ते गोवा दरम्यान नवी रेल्वे सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या रेल्वेतील प्रवाशांना वाय-फाय, सर्वोत्तम जेवण, चहा-कॉफीसाठी मशीन्स आणि सीटबरोबर एलसीडी स्क्रीनचा आनंद लुटता येणार आहे.

या सर्व सुखसोईयुक्त ही नवी प्रिमियर रेल्वे गाडी जून महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. 20 डबे असलेल्या तेजस एक्स्प्रेसला स्वंयचलित दरवाजे असतील. भारतात अशा प्रकारची रेल्वे प्रथमच धावणार आहे. सध्या भारतात फक्त मेट्रोला स्वयंचलित दरवाजे आहेत. मुंबई-गोवा मार्गावर ही रेल्वे यशस्वी झाल्यानंतर दिल्ली-चंदीगड दरम्यान अशी रेल्वे धावणार आहे.

वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस या रेल्वेमध्ये सर्व सोईसुविधा असणार आहेत. तसेच प्रवाशांना या सर्व गोष्टींचा उपभोग घेता येणार आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव येण्यासाठी हे सर्व करण्यात आले आहे. मनोरंजनाच्या दृष्टीने प्रत्येक सीटमागे एलसीडी स्क्रीन बसविण्यात आले आहेत. याबरोबरच या स्क्रीन्सवर सुरक्षेसंदर्भातही माहिती देण्यात येणार आहे. जेवणाचे पैसे राजधानी आणि शताब्दी रेल्वेप्रमाणे तिकीटातच समाविष्ट असतील.

Web Title: New Train Will Offer Wi-Fi, Cuisines By Celebrity Chefs, TV On Every Seat