तोंडी तलाक विधेयक लोकसभेत पुन्हा मांडले जाणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जून 2019

मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले. तत्पूर्वी विधेयक मांडण्यावरून सभागृहात मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जावे, याबाबत बहुमत मिळाले आहे.

नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले. तत्पूर्वी विधेयक मांडण्यावरून सभागृहात मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जावे, याबाबत बहुमत मिळाले आहे.

देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे हे विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा सादर करण्यात आले आहे. रविशंकर प्रसाद यांनी आधीच हे विधेयक पुन्हा संसदेत मांडण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज हे विधयेक मांडण्यात येत आहे.

दरम्यान, तोंडी तलाकचा मुद्दा हा भाजपच्या जाहीरनाम्यात होता, त्यामुळे हे विधेयक परत आणले जाईल. काँग्रेसकडून विधेयकाच्या मसुद्याला विरोध करण्यात आला असून, विधेयक मुस्लिम कुटुंबीयांच्या विरोधात असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 

थरूर, ओवेसींचा विरोध

काँग्रेस नेते शशी थरुर आणि एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाला विरोध केला असून, आक्षेप नोंदवला आहे. विधेयकातील अनेक तरतूदी संविधानाच्या विरोधी असल्याचे विरोधकांनी गदारोळादरम्यान म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Triple Talaq Bill will introduced in Lok Sabha