...आता व्हॉट्सऍप ठेवता येणार 'व्हेकेशन मोड'वर

whatsapp
whatsapp

नवी दिल्लीः चॅटींगबरोबरच माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले व्हॉट्सऍपने चार बदल केले असून, यापुढे व्हॉट्सऍप 'व्हेकेशन मोड'वर ठेवता येणार आहे.

फेसबुकने व्हॉट्सऍप खरेदी केल्यापासून नेटिझन्सनची गरज ओळखून सतत बदल केले जात आहेत. यामुळे नेटिझन्सचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नेटिझन्सची गरज ओळखून कंपनीने आता काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आयफोनच्या नव्याने लाँच झालेल्या फोनमध्ये हे नवीन अपडेटस देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यात iPhone Xr, iPhone Xs, iPhone Xs max या फोनचा समावेश आहे. यामधील काही फिचर्स आयओएसलाही सपोर्ट करणार आहेत. व्हॉटसअॅपच्या 2.18.100 या व्हर्जनवर हे बदल होणार आहेत.

युजर्स जर गावाला अथवा सुटीवर जाणार असेल तर तेवढ्या काळापुरता व्हॉटसअॅप बंद ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या अॅपवरील 'सायलेन्ट मोड'च्याच पुढचा टप्पा 'व्हेकेशन मोड' असणार आहे. सध्या सायलेन्ट मोडवर व्हॉट्स अॅप वापरताना किती मेसेज आले यासंर्भातील नोटीफिकेशन्सचे आकडे व्हॉट्स अॅपच्या आयकॉनवर दिसत नाहीत. त्याप्रमाणेच नवीन 'व्हेकेशन मोड'मध्ये व्हॉट्स अॅप म्यूटवर टाकल्यास येणारे नवीन मेसेजेस अर्काइव्हसमध्ये सेव्ह केले जातील मात्र, त्यावेळी आधीच अर्काइव्हमध्ये सेव्ह असणारे मेसेजही तेथेच राहतील.

नवीव बदल पुढीलप्रमाणेः
1) बबल अॅक्शन मेनूचे डिझाईन बदलण्यात आले आहे. जास्त वेळ टॅप केल्यावर तुम्हाला हा मेनू दिसू शकेल. तसेच यामध्ये डिलिट, रिप्लाय, फॉरवर्ड, स्टार, कॉपी आणि इतरही अनेक पर्याय उपलब्ध होतील.

2) सध्या ऑडीयो मेसेज आल्यावर प्रत्येक मेसेजवर जाऊन तो ऐकावा लागतो. मात्र, अपडेट करण्यात आलेल्या फिचरमध्ये सगळे ऑडीयो एकामागे एक असे ऐकता येणार आहेत.

3) अपडेट केलेल्या व्हॉटसअॅप स्टेटसमध्ये यापुर्वी केवळ टेक्स आणि स्मायली यांच्याद्वारे रिप्लाय देता येत होता. यामध्ये GIF, फोटो, व्हिडियो जोडण्याची सुविधा होती. यामध्ये आता व्हॉईस मेसेज, लोकेशन, डॉक्युमेंटस आणि व्हीकार्ड म्हणजेच कॉन्टॅक्ट शेअर करता येणार आहे.

4) व्हॉटसअॅपच्या नोटीफीकेशनमध्ये सध्या मेसेजशिवाय इमेज, GIF दिसतात. यापुढे व्हिडिओही दिसणार आहेत. व्हॉटसअॅपच्या 2.18.100 या व्हर्जनवर भविष्यात हा बदल होणार असून त्यामुळे आपल्याला कोणता व्हिडियो आला आहे हे नोटीफीकेशनद्वारे समजणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com