योगींच्या निवडीवर भाष्य; 'न्युयॉर्क टाईम्स'वर भारताची टीका

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झाल्याच्या निर्णयावर 'न्युयॉर्क टाईम्स'ने आपल्या संपादकीयातून टीका केली आहे. या संपादकीयवर नाराजी व्यक्त करत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लोकशाही पद्धतीने निवडणुकांद्वारे आलेल्या निकालांवर शंका घेणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात, अशा शब्दात टीका केली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झाल्याच्या निर्णयावर 'न्युयॉर्क टाईम्स'ने आपल्या संपादकीयातून टीका केली आहे. या संपादकीयवर नाराजी व्यक्त करत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लोकशाही पद्धतीने निवडणुकांद्वारे आलेल्या निकालांवर शंका घेणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात, अशा शब्दात टीका केली आहे.

याबाबत बोलतना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले, 'सर्व संपादकीय विचार हे व्यक्तिनिष्ठ असतात. हा तसाच प्रकार आहे. शुद्ध लोकशाही पद्धतीने निवडणुकांद्वारे आलेल्या निकालांवर देशात किंवा परदेशात शंका घेणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात.'

"कट्टर हिंदुत्ववाद्याला मोदींची धोकादायक मिठी' या शिर्षकाखाली "न्युयॉर्क टाईम्स'ने 23 मार्च रोजी संपादकीय लेख लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून आर्थिक प्रगती, विकास आणि धर्मनिरपेक्षतेच्या उद्दिष्टांना प्रोत्साहन देत त्यांच्या (भारतीय जनता पक्ष) पक्षाच्या कट्टर हिंदुत्ववादाला खूष करत आहेत, असे अग्रलेखात म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांची निवड म्हणजे धार्मिक अल्पसंख्यांकांना धक्का असल्याचेही अग्रलेखात पुढे म्हटले आहे.

Web Title: New York Times criticises Yogi Adityanath's appointment as UP CM, India hits back