भरदिवसा मुलींचा विनयभंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
रविवार, 28 मे 2017

रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मुलींचा भरदिवसा विनयभंग करून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रामपूर (उत्तर प्रदेश) : रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मुलींचा भरदिवसा विनयभंग करून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांच्या एका गटाने केलेला हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून या प्रकारामुळे उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

रामपूर जिल्ह्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला. दहा ते बारा जणांच्या मुलांची टोळी रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मुलींची छेड काढताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या महिला पुढे जाऊ देण्याची विनंती करत आहेत. हा सर्व प्रकार घडत असताना मुलांची टोळी मुलींचा विनयभंग करत असून विनोद करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून एका मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर रोमिओविरोधी पथकाची स्थापना केली होती. तसेच मुलींना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री दिली होती. मात्र, या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Web Title: up news up breaking news UP horror Women molested viral video