News Parliament Entry: संविधानाची प्रत उंचावत राहुल गांधीचा नव्या संसदेत प्रवेश!

जुन्या संसदेला निरोप देत आजपासून नव्या संसदेतून सर्व कामकाज चालणार आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : जुन्या संसद भवनातील सेन्ट्रल हॉलमध्ये निरोप समारंभ पार पडल्यानंतर आता सर्व लोकप्रतीनिधींनी जुन्या संसदेतून मागच्या बाजूला असलेल्या नव्या संसद भवनात प्रवेश केला.

यावेळी विरोधी पक्षाचं प्रतिनिधीत्व करत असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राहुल गांधी यांनी हातात संविधानाची प्रत उंचावत नव्या संसद भवनात प्रवेश केला. (News Parliament Entry Rahul Gandhi and congress MPs entry into new Parliament with Constitution copy)

खासदारांचा प्रवेश

नव्या संसदेतील प्रवेशद्वारावर 'सत्यमेव जयते' हे वचन मोठ्या अक्षरांमध्ये बसवण्यात आलं आहे. या अक्षरांखाली उभं राहुन आणि हातात संविधानाची प्रत घेऊन ती डोक्यावर उंचावून विरोधीपक्षाच्या नेत्यांनी नव्या संसदेत प्रवेश केला. (Latest Marathi News)

यावेळी खासदार राहुल गांधी यांच्यासह लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, खासदार गौरव गोगोई यांच्यासह इतर खासदारांची उपस्थिती होती. या प्रवेशाचा व्हिडिओ समोर आला आहे. (Marathi Tajya Batmya)

Rahul Gandhi
Samvidhan Sadan: जुन्या संसदेचं नवं नामकरण! 'संविधान सदन' म्हणून मिळणार नवी ओळख; PM मोदींची सूचना

संविधान सदन

दरम्यान, जुन्या संसद भवनातून आता नव्या संसद भवनात सर्व कारभार स्थलांतरीत केला जाणार आहे. पण जुन्या संसदेचं काय होणार? तर या जुन्या संसदेचं नवं नामकरणंही केलं जाऊ शकतं. पंतप्रधान मोदींनी याबाबत एक अपेक्षाही व्यक्त केली आहे. याला संविधान भवन म्हणून ओळखलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com