लग्नात बीफ न दिल्याने नवविवाहितेला तलाकची धमकी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

विवाह समारंभात बीफ न वाढल्याने सासरकडील मंडळींनी नवविवाहित महिलेला तलाक देण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडित महिला, तिचे पिता आणि भाऊ न्यायाच्या आशेने अनेक पोलिस स्थनकांमध्ये हेलपाटे मारत आहेत.

लखीमपुरखेरी (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभात बीफ न वाढल्याने सासरकडील मंडळींनी नवविवाहित महिलेला तलाक देण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडित महिला, तिचे पिता आणि भाऊ न्यायाच्या आशेने अनेक पोलिस स्थनकांमध्ये हेलपाटे मारत आहेत.

पीडित महिलेचा विवाह झाल्यानंतर विवाहनंतरच्या समारंभासाठी पिता बहारीच शहरातील तिच्या सासरी आले. त्यावेळी सासरकडील मंडळींनी विवाहसमारंभात बीफ दिले नसल्याची तक्रार करत 'तुमच्या मुलीला तलाक देऊ' अशी धमकी देऊ लागले. पीडित मुलीच्या पित्याने 22 एप्रिल रोजी सर्व विधींसह हुंडा देऊन मोठ्या थाटात विवाह करून दिला होता. मात्र तलाकच्या धमकीने ते अस्वस्थ झाले आहेत.

या प्रकरणी पीडित महिला, तिचे पिता आणि तिचा भाऊ अनेक पोलिस स्थानकात न्यायाच्या आशेने हेलपाटे मारत आहेत. दरम्यान पीडित महिलेच्या पित्याने मुलीच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली आहे. तर पीडित महिलेने या प्रकरणाची सविस्तर माहिती बहारीच पोलिसांना दिली आहे. आता या कुटुंबाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची या प्रकरणी मदत अपेक्षित आहे.

Web Title: News wed's family threatened with talaq over not serving beef