उत्तराखंडमध्ये RSS ची मदत; फोटो शेअर केल्यानं परेश रावल ट्रोल

paresh rawal utarakhand rss help image
paresh rawal utarakhand rss help image

नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतांची आकडेवारी आता 53 वर पोहोचली आहे. तपोवनच्या बोगद्यातून आज आणखी तीन मृतदेह बाहेर काढले. एनटीपीसीच्या तपोवन विष्णूगड प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या अदित बोगद्याजवळ तीन मृतदेह सापडल्याचे चमोलीच्या जिल्हाधिकारी स्वाती भादुरिया यांनी सांगितले.

गेल्या रविवारी घडलेल्या दुर्घटनेनंतर सलग आठ दिवस घटनास्थळी मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. तपोवन बोगद्यातील सुमारे १३५ मीटरपर्यंत चिखल आणि ढिगारे उपसण्यात आले आहेत. अडकलेले मृतदेह काळजीपूर्वक बाहेर काढले जात आहेत. उत्तराखंड राज्य आपत्ती निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २९ मृतदेहांची ओळख पटली आहे. 

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. भाजप प्रवक्त्यांसह बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक दिसत असून पर्वतांवर भरलेली पोती घेऊन जाताना दिसत आहेत. त्यासोबत पोस्ट लिहिण्यात आली आहे. त्यात असा दावा केला आहे की, चमोली तपोवनमध्ये जवळपास 13 गावांचे फक्त अवशेषच उरले आहेत. पूल वाहून गेले आहेत. रस्ते दिसतच नाहीत. अशा परिस्थितीत खांद्यावरून अन्न धान्याची पोती घेऊन स्वयंसेवक जात आहेत. खोऱ्यात कोणीही उपाशी राहू नये आणि आजारी पडू नये यासाठी काम करत आहेत असाही दावा केला आहे. 

वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा फोटो शेअर केला जात आहे. अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांनीही सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. मात्र यावरून परेश रावल आता ट्रोल होत आहेत. खोटे फोटो शेअर करून दावा केला जात असल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. 

व्हायरल पोस्टमधील फोटो गूगलवर रिव्हर्स सर्च केल्यानंतर सत्य समोर आलं आहे. सर्चमध्ये हा फोटो एका न्यूज वेबसाइटवर आहे. 2013 मध्ये पहिल्यांदा हा फोटो पब्लिश करण्यात आला होता. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये महापूर आला होता. तेव्हा आरएसएसच्या स्वयंसेवकांनी अनेक ठिकाणी कँप लावून पर्यटक आणि स्थानिकांना मदत केली होती. तर उत्तराखंडमध्ये ग्लेशियर 7 फेब्रुवारी 2021 ला तुटले होते. त्यानंतर उत्तराखंडमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम बचावकार्य करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com