महिला आणि पुरुषांच्या सेक्स पार्टनर्सबाबत केलेल्या एका सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणानुसार, 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सरासरी एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, पत्नी नसलेल्या किंवा एकत्र राहत नसलेल्या महिलांशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांची टक्केवारी ही चार टक्के असल्याचे आढळून आले. ही संख्या महिलांच्या सेक्स पार्टनर्सच्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (National Family Health Survey) हा 1.1 लाख महिला आणि 1 लाख पुरुषांमध्ये करण्यात आले होते, असे दिसून आले आहे की अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ही 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश राजस्थान, हरियाणा, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, आसाम, केरळ, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि तामिळनाडू अशी आहेत.
राजस्थानमध्ये एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. महिलांचे सरासरी 3.1 टक्के सेक्स पार्टनर आहेत, तर एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असलेल्या पुरुषांची सरासरी 1.8 टक्के इतकी आहे.
2019 ते 2021 या कालावधित घेण्यात आलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 मध्ये देशातील 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधील 707 जिल्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचे अहवाल सामाजिक-आर्थिक आणि इतर पार्श्वभूमीची वैशिष्ट्ये, धोरण तयार करणे आणि अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त डेटा देखील मिळवण्यात येतो. दरम्यान या NFHS डेटानुसार ग्रामीण महिलांमध्ये शहरी स्त्रियांच्या तुलनेत एकपेक्षा जास्त सेक्स पार्टनर (1.5 टक्के) होते, ग्रामीण स्त्रीया याबाबतीत पुढे असल्याचे आढळले आहे. त्यांच्या आयुष्यात सरासरी 1.8 पेक्षा अधिक सेक्स पार्टनर होते. तर ग्रामीण भागात पुरुषांचे सेक्स पार्टनर देखील इतकेच असल्याचे आढळून आले.
मध्य प्रदेशात प्रमाण सर्वाधिक
सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, महिलांचे दिल्लीमध्ये सरासरी 1.1 टक्के सेक्स पार्टनर आहेत. तसेच हा आकडा मध्य प्रदेशात सर्वाधिक 2.5 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 2.2 टक्के, तामिळनाडूमध्ये 2.4 टक्के, आसाममध्ये 2.1 टक्के आणि हरियाणामध्ये 1.8 टक्के आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.