पुण्यातील किळसवाणा प्रकार.. मध्यरात्री नग्न अवस्थेत घरात शिरला रिक्षाचालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

case registered against a auto rickshaw driver for entering naked midnight house Pune Yerawada

पुण्यातील किळसवाणा प्रकार.. मध्यरात्री नग्न अवस्थेत घरात शिरला रिक्षाचालक

पुणे : पुण्यातील येरवडा भागात किळसवाणा प्रकार घडला आला असून एक रिक्षाचालक तरुण मध्यरात्री नग्न अवस्थेत घरात शिरून महिलेच्या शेजारी झोपल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. यापूर्वी देखील या नराधमाने तीन महिलांच्या घरात नग्न अवस्थेत प्रवेश केले होता.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अरूण लहू गालफांडे (वय २४, रा. यशवंतनगर, येरवडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण हा रिक्षाचालक असून तो अहविवाहित आहे आणि येरवडा भागात राहायला आहे. तो आधीपासून तक्रारदार महिलेला ओळखतो. दरम्यान, पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास अरूण हा नग्न अवस्थेत त्यांच्या घरात शिरला. तक्रारदार महिलेला हे कळल्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला. मात्र तोपर्यंत अरूण तीतून पळून गेला होता. महिलेने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा: कळवा स्टेशनवर प्रवाशांचं आंदोलन, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर लोकल पुन्हा सुरू

Web Title: Case Registered Against A Auto Rickshaw Driver For Entering Naked Midnight House Pune Yerawada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newscrime