

Mobile-based safety alert system launched under the NHAI–Jio partnership to enhance real-time highway safety for drivers.
esakal
road safety system : राष्ट्रीय महामार्गांवर अर्थात हायवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, आता तुम्हाला हायवेवरील प्रवास करताना मार्गात येणाऱ्या जीवघेण्या धोक्यांचा अलर्ट आधीच मिळणार आहे. यासाठी NHAI ने रिलायन्स जिओ सोबत भागीदारी करून मोबाईल-आधारित सुरक्षा अलर्ट सिस्टम लाँच केली आहे. NHAI च्या मते की हा उपक्रम रस्ता सुरक्षेमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरासाठी एक नवीन मानक स्थापित करेल.
एनएचएआयने सांगितले की, यामुळे वाहनचालकांना एकाच प्लॅटफॉर्मवर रिअल-टाइम रस्त्यांची परिस्थिती, आपत्कालीन मदत आणि अलर्ट मिळतील. सुरूवात पायलट प्रोजेक्टने होईल, ज्यास राष्ट्रीय महामार्गांवर लागू केले पायलट जाईल. यशस्वी चाचणीनंतर, ही प्रणाली देशभरात सुरू केली जाईल.
या सिस्टमद्वारे, Jio च्या ५० कोटींहून अधिक युजर्सना महामार्गांवर प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता असलेल्या जागा, धुके, भटक्या प्राण्यांचे क्षेत्र आणि अचानक वळवणा बद्दल आगाऊ सूचना मिळतील. यासाठी SMS, WhatsApp आणि हायप्रायरेटी कॉलद्वारे अलर्ट पाठवले जातील. सुरुवातीला, ही प्रणाली काही महामार्गांवर पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू केली जाणार आहे.
NHAI आणि Reliance Jio मधील सामंजस्य कराराचा प्राथमिक उद्देश महामार्ग सुरक्षा मजबूत करणे आहे. Jio चे विस्तृत नेटवर्क प्रवास करताना चालकांना रिअल-टाइम अलर्ट प्रदान करेल, ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होईल. ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित असेल आणि महामार्गावरील त्यांच्या स्थानाच्या आधारे Jio युजर्सना संबंधित माहिती पाठवेल.
ही प्रणाली जिओच्या 4G आणि 5G नेटवर्कवर आधारित आहे. यामुळे महामार्ग वाहतूक व्यवस्थापन मजबूत होण्याची अपेक्षा आहे. ही प्रणाली राजमार्ग यात्रा अॅप आणि हेल्पलाइन 1033 शी जोडली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.