National Highway QR Code
esakal
महामार्गांवर QR कोड साइनबोर्ड बसवले जाणार
आपत्कालीन हेल्पलाइन, रुग्णालय, टोल माहिती सहज मिळणार
रस्ता सुरक्षा व प्रवासी सुविधा वाढणार
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नवीन पाऊल उचलत आहे. लवकरच महामार्गांवर QR कोड असलेले साइनबोर्ड (National Highway QR Code) बसवले जाणार असून, यामुळे प्रवाशांना प्रकल्पाशी संबंधित माहिती, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि जवळच्या सुविधा त्वरित मिळू शकतील.