esakal | सोशल डिस्टन्सिंगसाठी नवीन फॉर्म्युला; संसर्गाच्या जोखमीबाबत WHO च्या आयोगाचा अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

who  covid 19 social distancing

जागतिक आरोग्य संघटनेने नेमलेल्या आयोगाने कोरोनाच्या सामूहिक संसर्गाच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंगवर अभ्यास केला आहे.

सोशल डिस्टन्सिंगसाठी नवीन फॉर्म्युला; संसर्गाच्या जोखमीबाबत WHO च्या आयोगाचा अभ्यास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क - कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक आहे. संपर्कातून कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी ठराविक अंतरावरूनच एकमेकांशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय मास्क घालणे, वारंवार हात धुणे यासारख्या महत्त्वाची पथ्ये पाळावी लागतात. ही बाब आता सर्वांनाच ठाउक आहे. मात्र पहिल्या दिवसांपासून प्रत्येक शास्त्रज्ञ, संशोधक सोशल डिस्टन्सिंगबाबत वेगवेगळे मत मांडत आहेत. आता तर काही तज्ञ सोशल डिस्टन्सिंगसाठी नवीन फॉर्म्युला देत आहेत. त्यांच्या मते, दोन मीटरचे अंतर हे एक मीटरच्या अंतरापेक्षा दहा पटीने अधिक सुरक्षित आहे. याशिवाय अरुंद खोलीत किंवा कमी व्हेंटिलेशन असणाऱ्या ठिकाणी केवळ सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भागणार नाही.

आरोग्य संस्था काय म्हणतात
जागतिक आरोग्य संघटनेने नेमलेल्या आयोगाने कोरोनाच्या सामूहिक संसर्गाच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंगवर अभ्यास केला आहे. त्यात म्हटले की एक मीटरपेक्षा कमी अंतर असेल तर संसर्ग हेाण्याची जोखीम १२.८ टक्के आहे तर एक मीटरपेक्षा अधिक अंतर असेल तर ही जोखमी २.६ टक्केच राहते. मात्र ब्रिटन येथील शास्त्रीय सल्लागाराच्या गटाने दिलेल्या माहितीनुसार, दोन मीटरच्या तुलनेत एक मीटरचे अंतर हे संसर्गाची जोखीम वाढवते आणि ते प्रमाण दोन ते १० टक्क्यांपर्यंत राहते. या वेळी तज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनांच्या मार्गदर्शक सूचनांवर टीका करत म्हटले की, जुन्या तथ्यांच्या आधारे मांडलेले निकष उपयुक्त ठरतीलच असे नाही. कारण सार्स आणि मार्स संसर्गाच्या काळातही सोशल डिस्टन्सिंगबाबत जुनेच तंत्र वापरले गेले.

हे वाचा - कोविड-19 लस लवकरच मिळणार; WHOने दिली चांगली बातमी

केवळ सोशल डिस्टन्सिंग पुरेसे नाही
कमी आणि अरुंद ठिकाणी हवा खेळती राहत नाही आणि तेथे ब्रीदिंग ड्रॉपलेटसपासून संसर्ग पसरण्याचा धोका अधिक राहू शकतो. अशा ठिकाणी अंतर राखण्याबरोबरच मास्कचा वापर करणे देखील आवश्‍यक आहे. मोकळ्या ठिकाणी किमान एक मीटर अंतर असावे. अर्थात दोन मीटर अधिक सुरक्षित राहू शकते. तज्ञांच्या मते, दोन मीटरचे अंतर राखलेले असताना संसर्ग होण्याची शक्यता केवळ १ टक्के राहू शकते.

कोणत्या ठिकाणी संसर्गाचा किती धोका
लहान आणि बंदिस्त खोलीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. आपण कोठेही असाल तरीही तेथील व्हेंटिलेशन आणि शारिरीक अंतर किती आहे, यावर संसर्ग पसरण्याची तीव्रता अवलंबून असते. कमी जोखमीच्या आणि मध्यम जोखमीच्या ठिकाणी एक मीटरचे फिजिकल डिस्टन्सिंग राखणे आवश्‍यक आहे. मात्र अधिक जोखमीच्या ठिकाणी दोन मीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतर असणे आवश्‍यक आहे. संशोधन संस्था द बीएमजेने वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाची जोखीम कशी असते, याबाबत विश्‍लेषण केले आहे. त्यात अधिक, मध्यम आणि कमी जोखमीच्या ठिकाणांचे वर्गिंकरण केले आहे.

हे वाचा - कोरोनामुळे जगभरात चीनची 'नाचक्की'; बड्या देशांना जिनपिंग यांच्यावर नाही विश्वास

कोणत्या ठिकाणी अधिक धोका असू शकतो याबाबतही माहिती देण्यात आली आहे. म्यूझिक कॉन्सर्ट, बार आणि बंदिस्त हॉटेल, व्यायामशाळा, धार्मिक स्थळ, खेळाचे मैदान, सिनेमागृह या ठिकाणी जोखीम अधिक असू शकते. याखालोखाल मॉल, विमान, आऊटडोर रेस्टॉरंट, गर्दीच्या ठिकाणी फिरणे, ग्रोसरी सेंटर, ग्रंथालय आणि संग्रहालयांमध्येही कमी अधिक प्रमाणात संसर्गाची शक्यता असते. त्या तुलनेत वॉकिंग ट्रॅक, पेट्रोल पंप, रेसिंग ट्रॅकवर कमी जोखीम असते.