esakal | गौतम नवलखा यांचे ISIसोबत संबंध; कोरेगाव भीमा प्रकरणात एनआयएचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

gautam navlakha

सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संपर्क होता असा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. 

गौतम नवलखा यांचे ISIसोबत संबंध; कोरेगाव भीमा प्रकरणात एनआयएचा दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरेगाव भीमा प्रकरणी तपास करणाऱ्या एनआयएनं मोठा दावा केला आहे. सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संपर्क होता असा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. सरकारविरोधात विचारवंतांना एकत्र करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. राष्ट्रीय तपास संस्थेनं शुक्रवारी कोरेगाव भीमा एल्गार परिषद प्रकरणी त्यांच्या आरोपपत्रात हा दावा केला आहे.

एनआयएनं असंही म्हटलं आहे की, दिल्ली विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर हनी बाबू नक्षली भागात परदेशी माध्यमांच्या टूर आयोजित करण्यात त्यांचे सहाय्यक होते. आंध्र प्रदेश, तेलंगना याठिकाणी बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना रिव्होल्यूशनरी डेमोक्रेटिक फ्रंटच्या कामाची जबाबदारी त्यांना दिली होती. 

हे वाचा - एल्गार परिषद-कोरेगाव भीमा प्रकरणः नवलखा, तेलतुंबडेंसह 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल

एनआयएने आठ आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये नवलखा, बाबू, आनंद तेलतुंबडे, सागर गोरखे, रमेश गाइचोर, ज्योती जगताप, मिलिंद तेलतुंबडे, स्टेन स्वामी यांच्या विरोधात मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात नवलखा यांची भूमिका असल्याचा दावा करताना एनआयएने म्हटलं की, तपासात त्यांच्या आणि सीबीआय (माओवादी) यांच्यात संपर्क झाला होता. नवलाखा यांना सरकारविरोधात विचारवंतांना एकत्र करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. त्यांच्याकडे माओवाद्यांच्या कारवायांसाठी उमेदवारांची भरती करण्याचं काम दिलं  होतं असा दावा करण्यात आला आहे. 

एनआयएने असाही दावा केला की, गौतम नवलखा यांचे आयएसआयशी संबंध आहेत. तसंच बाबू माओवाद्यांच्या भागात परदेशी पत्रकारांच्या टूरचे आयोजन करत होते. आतंकवाद्यांच्या संघटनांशी ते संपर्कात होते. तसंच दोषी आरोपी जीएन साईबा सीपीआयच्या आदेशांवरून सर्व चाललं होतं आणि त्याच्यासाठी पैसे गोळा करण्याचं काम करत होते. 

कोरेगाव भीमा प्रकरणात एनआयएने 14 एप्रिलला गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांना अटक केली होती. त्यानंतर 28 जुलै रोजी बाबू यांना नोएडातून ताब्यात घेतलं होतं. तर स्वामींची यामध्ये भूमिका असल्याचं सांगत रांचीतून त्यांनाही अटक करण्यात आली. तेसुद्धा एका नक्षली असल्याचे सांगत ताब्यात घेतलं आहे.