पाकिस्तानी दहशतवादी बहादूर अलीविरोधात आरोपपत्र

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नवी दिल्ली- "लष्करे तैयबा'चा संशयित दहशतवादी असलेल्या सैफुल्ला मन्सूर उर्फ बहादूर अली (वय 21) याच्याविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (शुक्रवार) आरोपपत्र दाखल केले. नवी दिल्लीसह जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

बहादूर अलीला गेल्या वर्षी 24 जुलैला जम्मू आणि काश्‍मीरमध्ये अटक करण्यात आली होती. आपण पाकिस्तानी नागरिक असल्याचे आणि पाकिस्तानातच दहशतवादाचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याने कबूल केले आहे. अलीचा पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये झालेल्या संवादाची आणि त्याने दिलेल्या कबुलीची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. न्यायालयाने 19 डिसेंबरला झालेल्या सुनावणी वेळी बहादूर अलीला 18 जानेवारीपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दहशतवादी बुऱ्हाण वणीच्या मृत्यूनंतर काश्‍मीर खोऱ्यामध्ये दगडफेक करणे आणि अशांतता पसरविणे, हे आरोपही बहादूर अलीवर ठेवण्यात आले आहेत. "एनआयए'ने भारतीय दंडविधान, बेकायदा कारवायाविरोधी कायदा, स्फोटकेविरोधी कायदा, शस्त्रकायदा, परकी नागरिक कायदा आणि भारतीय बिनतारी दूरसंचार कायदा अशा विविध कायद्याअंतर्गत तरतूदींअन्वये आरोपपत्र दाखल केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्‍मीरमधील अशांततेला पाकिस्तानस्थित लष्करे तैयबा ही दहशतवादी संघटना कारणीभूत असल्याचा दावा आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे.

Web Title: NIA files charge sheet against captured Pakistani terrorist