झाकीरच्या कार्यालयांवर मुंबईत "एनआयए'चे छापे

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

मुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या डोंगरी येथील इस्लामिक रिसर्च फाउंडेशनसह (आयआरएफ) सहा कार्यालयांवर शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या वेळी काही महत्त्वाची माहिती त्यांनी जमा केली. काही कार्यालयांतील महत्त्वाच्या वस्तू आणि कागदपत्रांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केल्याचे समजते.

केंद्र सरकारने आयआरएफवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. तरुणांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप झाकीरवर आहे. मुंबई पोलिसांनी झाकीरच्या डोंगरी येथील आयआरएफ कार्यालयावर शुक्रवारी (ता. 18) नोटीस चिकटवली होती. एनआयएने झाकीरविरोधात गुन्हा दाखल केला होता. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी झाकीरच्या कार्यालयांवर शनिवारी सकाळी छापे टाकले. त्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांची 10 पथके तयार करण्यात आली होती. कार्यालयाबाहेर स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. रात्री उशिरापर्यंत एनआयएचे पथक डोंगरी परिसरात तळ ठोकून होते.

बेकायदा कारवाया केल्याप्रकरणी "आयआरएफ'च्या विरोधात "एनआयए'कडून शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ढाक्‍यातील हल्ल्यात सहभागी दहशतवादी हे नाईकच्या भाषणांमुळे प्रभावित झाल्याची बाब समोर आल्यानंतर नाईक आणि त्याच्याशी संबंधित संस्था तपास संस्थांच्या "रडार'वर आल्या आहेत.

नाईकच्या भाषणांवर ब्रिटन, कॅनडा आणि मलेशियानेही बंदी घातली आहे. "पीस टीव्ही' या इस्लामिक टीव्ही वाहिनीशी नाईकच्या "आयआरएफ' या संस्थेचा कथित संबंध असून, ही वृत्तवाहिनी मूलतत्त्ववादी विचार प्रसारित करण्यास मदत करत असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Web Title: NIA raids 10 premises of Zakir Naik's Islamic Research Foundation in Mumbai