
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतु अॅपला प्रोत्साहन दिलं.
नवी दिल्ली - आरोग्य सेतु अॅपवर केंद्रीय माहिती आयोगाचे नाव आहे पण त्या अॅपच्या डेव्हलपमेंटबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नॅशनल इन्फर्मेटिक सेंटरकडे नाही. त्यामुळे केंद्रीय माहिती आयोगाने मंगळवारी नॅशनल इन्फर्मेटिक सेंटरकडून उत्तर मागितलं आहे. जर तुमचं नाव आरोग्य सेतु अॅपच्या साइटवर आहे पण त्याबाबतची माहिती तुमच्याकडे का नाही असा प्रश्न आय़ोगाने विचारला आहे.
याबाबत नॅशनल इन्फर्मेशन सेंटरच्या अनेक प्रमुख अधिकाऱ्यांसह नॅशनल इ गव्हर्नन्स डिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि एनआयसीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये कोट्यवधी लोकांकडून वापरण्यात येणाऱ्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅपबाबत विचारण्यात आलेल्या माहितीचं उत्तर का दिलं नाही याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
हे वाचा - Paytm, PhonePe, G-Pay ची एक्सक्लुझिव्ह क्यूआर कोड सेवा बंद होणार
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतु अॅपला प्रोत्साहन दिलं. दरम्यान, आरोग्य सेतू अॅपच्या संकेतस्थळावर ही साइट नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डेव्हलप केलं आहे असं दिसतं. मात्र या अॅपबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलं की हे अॅप कोणी डेव्हलप केलं? पण याचं उत्तर नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरकडे नाही.