'त्याने' पोटात लपविल्या कोकेनच्या 90 गोळ्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- एका नायजेरियन व्यक्तीने कोकेनच्या 90 गोळ्या पोटामध्ये लपवून आणल्या होत्या. परंतु, येथील विमानतळावर चौकशीदरम्यान तो जाळ्यात अडकला.

नवी दिल्ली- एका नायजेरियन व्यक्तीने कोकेनच्या 90 गोळ्या पोटामध्ये लपवून आणल्या होत्या. परंतु, येथील विमानतळावर चौकशीदरम्यान तो जाळ्यात अडकला.

आमलीपदार्थ नियंत्रक पथकाचे उपसंचालक राजेंदरपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी विमानतळावर लागोस येथून विमान आले होते. विमानातील प्रवाशांची तपासणी सुरू होती. आफ्रिकन वंशाचा नागरिक टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. त्याच्या बॅगांची तपासणी करताना त्याच्यावर संशय बळावला. यावेळी त्याच्या बॅगांची व शरिराची यंत्राच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याने पोटात कोकेनच्या 1.3 किलो ग्रॅम वजनाच्या 90 गोळ्या पोटामधून लपवून आणल्याचे आढळून आले. रुग्णालयात जाऊन त्याच्या पोटातून गोळ्या काढून घेण्यात आले आहे. त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: Nigerian held with 1.3kg ingested cocaine pills in Delhi's IGI airport