Nikki Bhati Dowry Death : ग्रेटर नोएड्यातील २६ वर्षीय निक्की भाटीच्या मृत्यूने पुन्हा एकदा भारतातील हुंड्याच्या प्रथेचं भीषण वास्तव समोर आलं आहे. हुंडा सहा दशकांपूर्वी बेकायदेशीर ठरवण्यात आला असला तरी, आजही समाजात खोलवर रुजलेला आहे..२१ ऑगस्ट रोजी गंभीर भाजल्यानंतर निक्कीचा मृत्यू झाला. सिरसा गावातील सासरी तिला पेटवून देण्यात आल्याचा आरोप आहे. तिच्या पतीनं तिला मारहाण करून आगीत ढकलल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली. निक्कीच्या कुटुंबाचं म्हणणं आहे, की २०१६ मध्ये लग्नाच्या वेळी त्यांनी स्कॉर्पिओ एसयूव्ही, मोटारसायकल आणि सोने दिले होते. तरीही सासरच्यांनी ३६ लाख रुपये आणि आलिशान कारची मागणी केली होती..हुंड्याचं उदात्तीकरणमहिला हक्क कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी सांगितलं की, नुकत्याच झालेल्या एका लग्नात त्यांनी फॉर्च्युनर, मर्सिडीजसारख्या गाड्या हुंडा म्हणून उघडपणे दिल्या जाताना पाहिल्या. राजकारणी तिथे आनंद साजरा करत होते. हुंड्याचे असे उघडपणे उदात्तीकरण सहन न झाल्याने मी तेथून निघून गेले," असं त्या म्हणाल्या. निक्कीच्या प्रकरणावरही भयाना यांनी भाष्य केलं..भयाना यांनी सांगितलं की, 'निक्कीचा मृत्यू हा एक वेगळा गुन्हा नसून प्रणालीगत हिंसाचाराचा भाग आहे. निक्कीने अनेकदा छळ सहन केल्याचं सांगितलं तरी पालकांनी समाजाच्या भीतीपोटी तिला सासरी परत पाठवलं.'.राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, २०१७ ते २०२२ दरम्यान हुंड्याच्या छळामुळे ३५,४९३ महिलांचा मृत्यू झाला. म्हणजेच दररोज सरासरी २० महिला मृत्यूमुखी पडतात..अलीकडील प्रकरणेराजस्थानातील जोधपूरमध्ये शिक्षिका संजू बिश्नोई हिने हुंड्याच्या छळामुळे स्वतःला आणि आपल्या तीन वर्षांच्या मुलीला पेटवून दिलं. मध्य प्रदेशात एका २३ वर्षीय महिलेला पतीनं चाकूनं भोसकलं आणि गंभीर भाजल्याचं कारण देत तिला रुग्णालयात दाखल केलं होतं..मानसिक व कायदेशीर पैलूमानसशास्त्रज्ञ डॉ. श्वेता शर्मा यांच्या मते, "हुंडा हा पितृसत्ताक नियंत्रणाचं साधन बनलं आहे. स्त्रिया उच्च पदांवर पोहोचल्या तरीही त्यांच्याकडे अजूनही दायित्व म्हणून पाहिलं जातं. हुंडा हा पुरुषांच्या अहंकाराला खाद्य देतो," असे त्या म्हणाल्या..वकील सीमा कुशवाह यांनी सांगितलं की, कायदेशीर त्रुटी व सामाजिक पूर्वग्रहांमुळे हुंड्याचे खटले न्यायालयात कमकुवत होतात. वरपक्ष हुंड्याच्या वस्तूंना "भेटवस्तू" म्हणत आरोप फेटाळण्याचा प्रयत्न करतो. तसेच, क्रूरतेच्या खटल्यात मानसिक व भावनिक छळाला कमी लेखलं जातं, कारण न्यायालये दृश्यमान पुरावे शोधतात. दरम्यान, निक्कीचे लग्न १७ व्या वर्षी झाले होते. मृत्यूपूर्वी ती नऊ वर्षे सतत छळ सहन करत होती. सध्या तिचा पती, सासू, सासरा आणि दिर अटकेत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.