
येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला मोठा दिलासा मिळाला आहे. आज १६ जुलैला तिला फाशी दिली जाणार होती. पण तिच्या फाशीच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. ही स्थगिती मिळण्यासाठी ग्रँड मुफ्ती यांनी प्रयत्न केल्याची सध्या चर्चा होत आहे. कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातंय.