9 पायलटसह 32 क्रू मेंबर्सच्या रक्तात 'अल्कोहोल'; उड्डाणापूर्वीच पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

airlines

9 पायलटसह 32 क्रू मेंबर्सच्या रक्तात 'अल्कोहोल'; उड्डाणापूर्वीच पर्दाफाश

कोरोना महामारीच्या आधी पायलट आणि क्रू मेंबर्सची अल्कोहोल टेस्ट करण्यात येत होती मात्र कोरोनामुळे ही टेस्ट बंद करण्यात आली होती. आता कोरोना आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा अल्कोहोल टेस्ट सुरु करण्यात आली. यात आता 1 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान 9 पायलट आणि 32 क्रू मेंबर्स प्री-फ्लाइट अल्कोहोल टेस्टमध्ये दोषी आढळून आले. डीजीसीएने (DGCA) यासंदर्भात माहिती दिली. (9 pilots and 32 cabin crew members suspended for being positive in pre flight alcohol tests)

हेही वाचा: Asani Cyclone : आंध्र प्रदेशात तुफान पाऊस, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण

डीजीसीएने एका निवेदनाद्वारे सांगितले की या 9 पायलट आणि 32 क्रू मेंबर्स पैकी दोन पायलट आणि दोन क्रू मेंबर्स दुसऱ्यांदा चाचणीत दोषी आढळले. त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे तर बाकी सात पायलट आणि 30 क्रू मेंबर्सना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले.

हेही वाचा: वैवाहिक बलात्कार गुन्हा आहे की नाही? दिल्ली हायकोर्टाच्या निकालाकडं लक्ष

डीजीसीएने गेल्या महिन्यात सांगितले होते की, विमान कंपन्यांनी त्यांच्या ५० टक्के पायलट आणि क्रू मेंबर्सची 'अल्कोहोल टेस्ट' केली पाहिजे. आता या मोठ्या कारवाईने हवाई क्षेत्रात खळबळ उडाली असून अल्कोहोल घेणाऱ्यांना चांगलाच चाप बसलाय

Web Title: Nine Pilots And 32 Cabin Crew Members Suspended For Being Positive In Pre Flight Alcohol Tests

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top