'निपाह' नियंत्रणात : केंद्रीय आरोग्यमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

निपाह विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात आल्यानंतर 12 तासांमध्ये डॉक्टरांचे पथक केरळ येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत चर्चा केली आणि त्यांनी दिलेल्या कालावधीत 'निपाह'वर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आता याबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही.  

- जे. पी. नड्डा,  केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली : 'निपाह' विषाणूची लागण झाल्यामुळे आत्तापर्यंत 16 हून अधिकांचा जीव गेला. त्यानंतर आज (मंगळवार) केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, निपाह विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात आल्यानंतर 12 तासांमध्ये डॉक्टरांचे पथक केरळ येथे दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत चर्चा केली आणि त्यांनी दिलेल्या कालावधीत 'निपाह'वर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आता यावर घाबरून जाण्याचे कारण नाही.  

केरळमधील शेकडो लोकांना निपाहची लागण झाल्याचे समोर आले. तसेच यामध्ये 16 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यावर नड्डा यांनी सांगितले, की केरळमध्ये अद्यापही निपाह विषाणूचा कहर कायम आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला. तर शेकडो जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'निपाह' विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांपर्यंत तातडीची वैद्यकीय मदत पोहोचवली जात आहे.

तसेच पुण्यातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलजी' आणि 'नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलचे डॉक्टर आणि 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' (एम्स), सफदरजंग रुग्णालयाचे डॉक्टर केरळच्या आरोग्य विभागाच्या संपर्कात असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करत आहेत,' असे नड्डा यांनी सांगितले. 

Web Title: Nipah situation under control says Union Health Minister JP Nadda