

Nipah Virus Case Detected in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे किमान दोन रुग्ण आढळले आहेत. या आजाराची तीव्रता लक्षात घेता, केंद्र सरकारने संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी नॅशनल ज्वॉईंट ऑउटब्रेक रिस्पॉन्स टीम राज्यात पाठवले आहे. या प्रकरणांनंतर, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून केंद्र सरकारच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
निपाह हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो प्रामुख्याने वटवाघुळ, डुक्कर, कुत्रे आणि घोडे यांसारख्या प्राण्यांमध्ये पसरतो. तथापि, तो संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या मानवांमध्ये देखील पसरू शकतो आणि गंभीर आजार निर्माण करू शकतो. निपाह सामान्यतः ताप आणि मेंदूला सूज या रूपात समोर येतो आणि तो अत्यंत घातक असू शकतो.
परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य सचिवांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि प्रधान सचिव (आरोग्य) यांच्याशीही या विषयावर संपर्क साधला. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि त्वरित कारवाईची रूपरेषा आखण्यात आली.
केंद्र सरकारने नॅशनल ज्वॉईंट ऑउटब्रेक रिस्पॉन्स टीम बंगालमध्ये पाठवली आहे. ही टीम कोलकाता येथील अखिल भारतीय आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता संस्था, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, चेन्नईतील राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्था, एम्स कल्याणी आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत वन्यजीव विभागातील तज्ञांसह तपासणी करेल. हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरत आहे का याची तज्ञ चौकशी करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.