पीएनबी गैरव्यवहार प्रकरण : नीरव मोदीच्या कोठडीत वाढ

पीएनबी गैरव्यवहार प्रकरण : नीरव मोदीच्या कोठडीत वाढ

लंडन : पीएनबी गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्या कोठडीत 27 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टात याबाबतची सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जुलैला होणार आहे.

13700 कोटी रुपयांच्या पीएनबी गैरव्यवहारातील आरोपी नीरव मोदी लंडनमधील वंड्सवर्थ कारागृहात आहे. नीरव मोदीला सेंट्रल लंडनच्या मेट्रो बँक शाखेतून 19 मार्च रोजी अटक करण्यात आली. तो बँक खाते उघडण्यासाठी तेथे गेला होता.

सशर्त जामीनासाठीचा अर्ज फेटाळला

नीरवचा सशर्त जामीन अर्ज आत्तापर्यंत तीनवेळा फेटाळण्यात आला आहे. त्याने 8 मे रोजी शेवटचा अर्ज केला होता. वंड्सवर्थ तुरुंग हे राहण्यायोग्य नसल्याचे कारण यावेळी देण्यात आले होते. 

जामीन फेटाळताना 'हे गंभीर स्वरुपाचे प्रकरण असून हा एक मोठा फसवणुकीचा गुन्हा आहे. ज्यामुळे भारतीय बँकांचे नुकसान झाले आहे. नीरवला सशर्त जामीन मंजूर झाल्याने भारत सरकारची चिंता मिटेल, असे मला वाटत नाही, असे स्पष्टीकरण मुख्य न्यायाधीश अॅबर्थनॉट यांनी दिले आहे. 

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पीएनबी घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. मात्र, त्यापूर्वीच नीरव विदेशात पळून गेला होता. त्याने पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊसच्या शाखा अधिकाऱ्यांशी भागीदारी करून फर्जी लेटर ऑफ अंडरटेकिंग्स (एलओयू) मंजूर करून घेतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com