Nirav Modi : नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, ब्रिटन कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirav Modi News

Nirav Modi : नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, ब्रिटन कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्लीः सात हजार कोटींचा पीएनबी घोटाळा करुन पसार झालेल्या निरव मोदीच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

भारताकडे प्रत्यापर्णासंदर्भात ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र न्यायालयाने मोदीला जोरदार झटका दिला असून त्याचं अपिल कोर्टाने फेटाळलं आहे. त्यामुळे त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रत्यापर्णाविरुद्धचं नीरव मोदीचं शेवटचं अपिल युके सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे.

हेही वाचा: Elephant attacks : जंगली हत्तींच्या कळपाने केला हल्ला; चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नीरव मोदीला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय कोर्टाने दिला होता. या निर्णयाविरोधात नीरव मोदीने ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली. मागील दिवसांपासून नीरव मोदीला भारतात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तो ब्रिटनच्या जेलमध्ये असून प्रत्यार्पण रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

विशेष पीएमएलए कोर्टाने डिसेंबर 2019 मध्ये आर्थिक फसवणूक कायदा 2018 नुसार नीरव मोदीला फरारी म्हणून घोषित केले होते. नीरव मोदीवर PNB मधून सुमारे 7000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मोदीने भारताततून परदेशात पलायन केले होते. मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात असून, त्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.