'निर्भया'तील दोषींनो तुम्ही लटकणारच; वेळ अन् तारिखही ठरली

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

'निर्भया'प्रकरणात मुकेश (वय 32), पवन गुप्ता (वय 25), विनय शर्मा (वय 26) आणि अक्षय कुमारसिंह (वय 31) यांना फासावर लटकविण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना येत्या 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी देण्यात येणार हे निश्चित झाले आहे. या आरोपींपैकी दोन आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्यांदा दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणातील दोषी विनय शर्मा आणि मुकेश यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्यायधीश अरुण मिश्रा, न्यायधीश आर. एफ. नरीमन, न्यायधीश आर बनुमथी आणि न्यायधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली. फाशीपासून वाचण्यासाठीची आरोपींची ही अखेरची संधी होती. आता त्यांना फासावर लटकविले जाणार हे निश्चित आहे. 

'वादग्रस्त पुस्तकाशी संबंध नाही'; भाजपचे 'हात वर', तर लेखकाचा माफीनामा 

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना 22 जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी देण्यात येणार आहे. याची रंगीत तालीम तिहार कारागृहात रविवारी घेण्यात आली. रंगीत तालमीसाठी अधिकाऱ्यांनी दोषींचे वजन घेऊन त्यानुसार बनावट प्रतिकृती तयार केली. त्यासाठी दगड आणि अवशेषाने भरलेल्या पोत्यांचा वापर करण्यात आला. कारागृह क्र. 3 मध्ये फाशीची रंगीत तालीम अधिकाऱ्यांच्या पथकाने घेतली. फाशीसाठी वापरण्यात येणारे दोर एवढे वजन पेलवू शकतात का, चौघांना फाशी देण्यासाठी किती वेळ लागतो आणि फाशीच्या चारही ठिकाणी काही तांत्रिक त्रुटी राहिली नाही व याची खात्री करून घेण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याचे समाधान तुरुंगाचे अधिकऱ्यांना वाटत आहे. वेळेचे नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यासाठी फाशी देण्यासाठी लागणारा वेळ थोडा कमी करण्यात येण्याची शक्‍यता आहे. चारही दोषींना फाशी देण्यासाठी मेरठहून पवन जल्लादची रवानगी तिहारला करण्यात आले असल्याच्या वृत्ताला उत्तर प्रदेश कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे. 

'निर्भया'प्रकरणात मुकेश (वय 32), पवन गुप्ता (वय 25), विनय शर्मा (वय 26) आणि अक्षय कुमारसिंह (वय 31) यांना फासावर लटकविण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya rape-murder convicts will hang Supreme Court says again rejects curative petitions