निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी कायम

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जुलै 2018

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवणयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या प्रकरणातील दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

नवी दिल्ली- निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवणयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या प्रकरणातील दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना गेल्या वर्षी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिकाच फेटाळली आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. या याचिकेवर पुनर्विचार करण्यासाठी कोणतीच पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्यावर पुनर्विचार करता येणार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळूली आहे.

दोषींची फाशीची शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. परंतु, सरकारी वकिलांनी या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचे अपील केले होते, ते सर्वोच्च न्यायलयाने मान्य करत या दोषींची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये फिजिओथेरपीचे शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय निर्भयावर दोषींनी चालत्या बसमध्ये पाशवी बलात्कार करून तिला तिच्या मित्रासह मरणासन्न अवस्थेत महामार्गावर फेकून दिले होते. या प्रकरणाने पूर्ण देश हादरला होता. 

Web Title: nirbhaya verdict supreme court rejects review petition uphold death penalty