औरंगजेबच्या नातेवाइकांचे संरक्षणमंत्र्यांकडून सांत्वन

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

ईदच्या दोन दिवस आधी दहशतवाद्यांनी अपहरण करत हत्या केलेल्या औरंगजेब या लष्करी जवानाच्या नातेवाइकांची केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज भेट घेतली. देशासाठी बलिदान देणारा औरंगजेब हा अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, असे सीतारामन या वेळी म्हणाल्या. 

जम्मू - ईदच्या दोन दिवस आधी दहशतवाद्यांनी अपहरण करत हत्या केलेल्या औरंगजेब या लष्करी जवानाच्या नातेवाइकांची केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज भेट घेतली. देशासाठी बलिदान देणारा औरंगजेब हा अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, असे सीतारामन या वेळी म्हणाल्या. 

जम्मू आणि काश्‍मीरमधील पूँच जिल्ह्यातील सीमेजवळच्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या सलानी या औरंगजेबच्या गावातील निवासस्थानाला सीतारामन यांनी भेट दिली. या वेळी वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. 

सीतारामन यांनी औरंगजेबच्या नातेवाइकांचे सांत्वन केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी औरंगजेबच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यांच्या निवासस्थानाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सीतारामन म्हणाल्या, औरंगजेबचे बलिदान देशासाठी प्रेरणास्रोत ठरेल, हा संदेश घेऊन मी येथून जाते आहे. 

औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घ्या 
काश्‍मीर खोऱ्यातून दहशतवाद्यांचा निःपात करत औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेण्याची विनंती त्याच्या वडिलांनी सरकार आणि लष्कराला केली आहे. औरंगजेबचे वडीलही निवृत्त जवान आहेत. 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत असलेला औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी आपल्या गावी जात असताना त्याचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला होता. 

Web Title: Nirmala Sitharaman Consoles Slain Rifleman Aurangzeb's Family