Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मुलीचे लग्न अत्यंत साधेपणाने, सोहळ्याला एकही VIP नव्हता

या सोहळ्याला एकही राजकीय नेता उपस्थित नव्हता.
Nirmala Sitharaman Daughter Parakala Vangmayi gets married bengaluru no vip
Nirmala Sitharaman Daughter Parakala Vangmayi gets married bengaluru no vip

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मुलगी परकला वांगमयी हिचा विवाह गुरुवारी त्यांच्या बंगळुरू येथील घरी पार पडला. या खास लग्न सोहळ्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे देशाच्या अर्थमंत्री असुनही त्यांच्या सोहळ्याला एकही व्हीआयपी गेस्ट नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे. (Nirmala Sitharaman Daughter Parakala Vangmayi gets married bengaluru no vip)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. व्हिडीओमध्ये वैदिक मंत्रोच्चार ऐकू येत आहेत. तसेच, वधू वराजवळ निर्मला सीतारमण दिसत आहेत. काही युजर्स निर्मला सीतारमण यांचं कौतुकही करत आहेत.

असं सांगण्यात येतंय की, परकला वांगमयीचं लग्न बंगळुरूत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याला एकही राजकीय नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

निर्मला सीतारमण यांची कन्या परकला वांगमयीच्या पतीचं नाव प्रतीक आहे. अर्थमंत्र्यांच्या मुलीचा विवाह ब्राह्मण परंपरेनुसार आणि उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या आशीर्वादानं पार पडला.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. व्हिडीओमध्ये वैदिक मंत्रोच्चार ऐकू येत आहेत. तसेच, वधू वराजवळ निर्मला सीतारणही दिसत आहेत. काही युजर्स निर्मला सीतारमण यांचं कौतुकही करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com