Parakala Prabhakar
ESAKAL
देशातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून (एसआयआर) सुरू असलेला वाद आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर हे २३ ऑक्टोबर रोजी एसआयआरविरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.