जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बोगद्याचा भाग कोसळला, अनेकजण अडकले

बोगद्याच्या ऑडिटचं काम सुरू असताना हा भाग कोसळल्याचं सांगितलं जात आहे.
tunnel
tunnelANI
Summary

बोगद्याच्या ऑडिटचं काम सुरू असताना हा भाग कोसळल्याचं सांगितलं जात आहे.

मागील काही महिन्यांपासून जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका बोगद्याचं काम सुरू आहे. दरम्यान, या ठिकाणाहून आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बोगद्याचं काम सुरू असताना येथे मोठी दुर्घटना घडली आहे. मेकरकोट परिसरातील खूनी नाला इथं बोगद्याचा काही भाग कोसळला अजून ६ ते ७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

tunnel
अखेर १६ दिवसांनी देशपांडे, धुरी पोहचले शिवतीर्थवर; राज ठाकरेंची घेतली भेट

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव मोहिमेदरम्यान दोन जणांची सुटका करण्यात आली असून सात जण अजूनही बोगद्यात अडकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेले लोक बोगद्याचं ऑडिट करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आहेत. बनिहालहून घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा बोगद्यासमोर बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशिन आणि वाहने उभी होती. बोगदा कोसळल्याने त्यांचेही पूर्ण नुकसान झाले आहे. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि एसएसपी मोहिता शर्मा बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

tunnel
अजयपुर जवळ 2 ट्रकमध्ये जोराची धडक, 4 जण जागीच ठार

दरम्यान, या दुर्घटनेबाबत रामबन येथील उपायुक्तांनी माहिती दिली आहे. यामध्ये काही जण अडकल्याची शक्यता असून बचावकार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बोगद्याच्या ऑडिटचं काम सुरू असताना हा भाग कोसळल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अडकलेले लोक ऑडिटचं काम करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com