Nitin Gadkari : ई20 पेट्रोलमुळे समस्या आलेल्या एका गाडीचे नाव सांगा; नितीन गडकरींचे टीकाकारांना थेट आव्हान

Gadkari Defends E20 Petrol and Promotes Ethanol-Based Fuel Adoption : ई20 पेट्रोलमुळे एकाही वाहनात बिघाड झाल्याचे उदाहरण नसल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीकाकारांना अशा एका गाडीचे नाव सांगण्याचे थेट आव्हान दिले.
Nitin Gadkari

Nitin Gadkari

esakal

Updated on

इथेनॉल-मिश्रित इंधनावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ई20 पेट्रोलच्या टीकाकारांना थेट आव्हान दिले आहे. ई20 पेट्रोलमुळे वाहनांमध्ये बिघाड झाल्याचा एकही ठोस दाखला नसल्याचा दावा करत, "अशा एका गाडीचे तरी नाव सांगा," असे त्यांनी म्हटले. ई20 पेट्रोलच्या अनिवार्य वापराबाबत होणारी टीका आणि वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com