

Nitin Gadkari
Esakal
इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विक्रीवरून बराच गदारोळ माजला होता. आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलचं समर्थन केलंय. ई२० मुळे गाड्यांचे नुकसान होते असे आरोप करणारे व्हिडीओ, मेसेज व्हायरल झाले होते. त्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं. तसंच दिग्गज कंपन्यांनीही ई२०मुळे गाड्या खराब होत नाहीत असं सांगितलं होतं. दरम्यान, नितीन गडकरी यांनी आता इथेनॉलमुळे गाड्या खराब होत नाहीत असं सांगताना १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कारही लवकरच लाँच होणार असल्याचं म्हटलंय.