भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा निर्माण करण्यासाठी प्रयत्न: गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

गेल्या काही दिवसांपासून मी पाहत आहे की, मी कुठल्याही गोष्टीवर वक्तव्य केल्यास त्या वक्तव्याची मोडतोड करून भलताच अर्थ काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून आणि माध्यमातील ठराविक गटांकडून होताना दिसत असल्याची खंत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा निर्माण करण्यासाठीच चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. यातून मला आणि माझ्या पक्षाला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्नही होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून मी पाहत आहे की, मी कुठल्याही गोष्टीवर वक्तव्य केल्यास त्या वक्तव्याची मोडतोड करून भलताच अर्थ काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून आणि माध्यमातील ठराविक गटांकडून होताना दिसत असल्याची खंत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा निर्माण करण्यासाठीच चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. यातून मला आणि माझ्या पक्षाला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्नही होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 

मी अशा गोष्टी बारकाईने तपासण्याचा प्रयत्न करत असल्याचेही गडकरींनी सांगितले आहे. वेळोवेळी अशा गोष्टींवर निर्बंध घालण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, माझ्या वक्तव्य्यांची अशी मोडतोड केल्याने भाजप नेतृत्व आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांचा हेतू कधीच साध्य होणार नाही.
 

मी वेळोवेळी माझ्या कामाविषयी वेगवेगळ्या ठिकाणी स्पष्टीकरण देत राहिल जेणेकरून विरोधकांचा कुठलाच हेतू साध्य होणार नसल्याचेही गडकरी यांनी सांगितले आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त पुण्यातील नूमवी प्रशालेत आज (रविवार) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शिबिराचे उद्गाटन झाले.

 

 

Web Title: nitin gadkari gives clarification on his earlier statement by now saying it is an effort to wedge a divide between him and bjp mk