
आगामी दोन वर्षांत देशातील अधिकाधिक शहरांतील बससेवा, रिक्षा व खासगी ई वाहने सध्याच्याच दरात उपलब्ध करून देणे हे लक्ष्य असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.
नवी दिल्ली - सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरसारख्या सुविधा थेट शेतकऱ्यांपर्यंत रास्त दरात व जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवून केंद्र सरकार शेतकऱ्याला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. आगामी दोन वर्षांत देशातील अधिकाधिक शहरांतील बससेवा, रिक्षा व खासगी ई वाहने सध्याच्याच दरात उपलब्ध करून देणे हे लक्ष्य असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.
गडकरी यांनी आज पर्यावरणपूरक अशा देशातील पहिल्या सीएनजी ट्रॅक्टरचे उद्घाटन केले. त्यांनी स्वतःचाच डिझेलवरील ट्रॅक्टर सीएनजीमध्ये परावर्तित केला आहे. या कार्यक्रमाला पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला व गडकरींच्या मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंह, या परिवर्तनाचे काम करणाऱ्या तोमाशिटो कंपनीचे भारतातील मुख्याधिकारी अमित शहा, रोमॅट कंपनीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर ग्रामीण भारत व आत्मनिर्भर शेतकरी यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सीएनजी ट्रॅक्टर भविष्यात देशातील शेतकऱ्याला ४० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध करून देणे हे आपले उद्दिष्ट राहील असे गडकरी यांनी पत्रकारांना सांगितले.
गडकरी आज पुणे दौऱ्यावर
गडकरी उद्या (ता. १३) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थिती नितीन लावणार आहेत. याबरोबरच गडकरी हे पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणीही करतील.