

road accidents India
esakal
Nitin Gadkari Statement : रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक मोठी पावले उचलत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आयआयटी मद्रास येथे रस्ते सुरक्षेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले आहे. हे केंद्र शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सरकार यांच्यात सहकार्य वाढवून रस्ते सुरक्षेतील सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. २०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्यांनी कमी करणे आणि २०४० पर्यंत शून्य मृत्यू साध्य करणे हे त्याचे ध्येय आहे.
यासाठी सरकारने फॅटिलिटी कॉरिडॉर ओळखले असून यामध्ये ब्लॅक स्पॉट्स दुरुस्त करणे, ट्रॅफिग कॅल्मिग, साइनेज इत्यादी आदी सुधारणा केल्याच जात असल्याची माहिती, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.
याशिवाय अपघात कमी करण्यासाठी, प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली स्थापित करण्याची सरकारची योजना आहे. यामध्ये एआय- व्हिडिओ इंसिडेंट डिटेक्शन, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेरा आणि सर्विलान्स कॅमेरे यांचा समावेश आहे. या प्रणाली अपघातांची लवकर माहिती मिळवतात, उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करतात आणि रिअल-टाइम प्रतिसाद देखील देतात.
दिल्ली-मेरठ आणि ट्रान्स-हरियाणा महामार्गांसारख्या अनेक जास्त रहदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर आणि द्रुतगती महामार्गांवर एटीएमएस आधीच बसवलेले आहेत आणि आता ते सर्व 4-लेन राष्ट्रीय महामार्गांवरही विस्तारित केले जातील.
याशिवाय, वाहने अधिक सुरक्षित करण्यासाठी, मध्यम आणि जड वाहनांसाठी (M2, M3, N1, N2, N3 आणि क्वाड्रिसायकल) अक्टिव्ह फिचर्स अनिवार्य केले आहेत. यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, एंड्युरन्स ब्रेकिंग, व्हिकल स्टेबिलिटी फंक्शन, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्रायव्हरची ड्राउजिनेस आणि अटेंशन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट इन्फार्मेशन, मूव्हिंग ऑफ इन्फार्मेशन सिस्टम आदींचा समावेश आहे. हे नवीन मॉडेल्ससाठी १ जानेवारी २०२७ पासून आणि विद्यमान मॉडेल्ससाठी १ ऑक्टोबर २०२७ आणि जानेवारी २०२८ पासून लागू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.