Turkish Airlines Emergency Landing : २३६ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनला अवघ्या काही मिनिटांतच लागली आग!

Turkish Airlines emergency landing after engine fire : अखेर कोलकातामध्ये करावे लागले इमर्जन्सी लँडिंग ; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
Turkish Airlines aircraft seen at Kolkata airport after making an emergency landing due to an engine fire during its Kathmandu–Istanbul journey.

Turkish Airlines aircraft seen at Kolkata airport after making an emergency landing due to an engine fire during its Kathmandu–Istanbul journey.

esakal

Updated on

Engine Fire on Turkish Airlines Flight : काठमांडू येथून इस्तंबूलला जाणारे तुर्की एअरलाइन्सचे वाइडबॉडी विमान बुधवारी दुपारी तांत्रिक बिघाडामुळे कोलकात्याला वळवावे लागले. नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले असतानाच त्याच्या एका इंजिनमधून धूर निघू लागल्याचे पायलटच्य लक्षात आले.

या इंजिनमध्ये आग लागल्याची शक्यता जाणवल्याने या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सुदैवाने विमानातील सर्व २३६ प्रवासी आणि ११ क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे वृत्त आहे आणि विमानाची तपासणी केली जात आहे.

विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्की एअरलाइन्सचे विमान क्रमांक THY-७२७ दुपारी दीड वाजता काठमांडूहून उड्डाण केले.  विमान आकाशात जात असतानाच , वैमानिकांना विमानाच्या दोन इंजिनांपैकी एकाने काम करणे थांबवल्याचा सिग्नल मिळाला होता.

Turkish Airlines aircraft seen at Kolkata airport after making an emergency landing due to an engine fire during its Kathmandu–Istanbul journey.
Manipur President’s Rule Ends: वर्षभरानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात ; युमनाम खेमचंद सिंह घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, वैमानिकांनी ताबडतोब काठमांडू एटीसीला याबबाबत माहिती दिली आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी धाडिंग जिल्ह्यातील धरके परिसरावर विमानाला थोड्या वेळासाठी रोखले. यानंतर तपासणी केल्यावर, कर्मचाऱ्यांनी असा निष्कर्ष काढला की एकाच इंजिनसह लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू ठेवणे सुरक्षित नाही.

Turkish Airlines aircraft seen at Kolkata airport after making an emergency landing due to an engine fire during its Kathmandu–Istanbul journey.
Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

परिणामी विमानाकडे काठमांडूला परतण्याचा किंवा भैरहवा विमानतळावर उतरण्याचा पर्याय असला होता. मात्र, सुरक्षेला प्राधान्य देऊन, कर्मचाऱ्यांनी कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आणि विमान कोलकाता विमानतळाकडे वळवले.

Turkish Airlines aircraft seen at Kolkata airport after making an emergency landing due to an engine fire during its Kathmandu–Istanbul journey.
Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

तर अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. कारण उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या इंजिनला आग लागल्याची माहिती मिळाली होती. तर शिवाय, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महाव्यवस्थापक टेकनाथ सिटौला यांनी सांगितले की, तुर्की एअरलाइन्सचे विमान THY-७२७ ने दुपारी दीड वाजेच्या सुमारास उड्डाण घेतल्यानंतर चार मिनिटांतच विमानाच्या उजव्या इंजिनला आग लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com