नितीन गडकरींच्या विधानानंतर लोकसभेत हशा पिकला; म्हणाले...

Nitin Gadkari
Nitin GadkariNitin Gadkari

नायिकेची भूमिका केल्यानंतर एखाद्या अभिनेत्रीने पात्र भूमिका घेतली तर पुन्हा नायिका बनणे अवघड होऊन बसते. त्याचप्रमाणे जुन्या वाहनांमध्ये नवीन गाड्यांचे फीचर्स बसवणे अवघड आहे, असे विधान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केल्याने बुधवारी लोकसभेत हशा पिकला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मंत्री नितीन गडकरी कारसाठी स्टार रेटिंग प्रणालीवरील पूरक प्रश्नांची उत्तरे देत असताना असे म्हटले.

सुरक्षितता आणि सोयीच्या दृष्टीने नवीन वाहनांमध्ये (vehicle) अधिक चांगले फीचर्स येत आहेत. परंतु, जे वाहने दोन-तीन वर्षे जुनी आहेत ते एकप्रकारे नवीन आहेत. त्यामुळे या वाहनांमध्येही नवीन फीचर्स टाकता येतील का, असा प्रश्न रूपा गांगुली (Rupa Ganguly) यांनी विचारला होता. रेटिंग सिस्टीम नवीन वाहनांसाठी आहे. जुन्या वाहनांमध्ये तसे करणे अवघड आहे. पात्र भूमिका केल्यानंतर नायिकेला पुन्हा नायिका बनणे कठीण होते. हीच गोष्ट नायकालाही लागू होते, असे उत्तर देताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

Nitin Gadkari
युद्ध रशिया-युक्रेनचं अन् फायदा भारतातील शेतकऱ्यांना

ही टिप्पणी कोणत्याही सदस्याबद्दल नव्हती. फक्त विनोद म्हणून घेतली पाहिजे, असेही नितीन गडकरी म्हणाले. रूपा गांगुली (Rupa Ganguly) या टीव्ही आणि चित्रपटांची प्रसिद्ध कलाकार आहे. त्यांनी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘महाभारत’ या सुप्रसिद्ध मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारली होती, हे विशेष...

कारचे सुरक्षेच्या आधारावर मूल्यांकन

रस्ते अपघातातील वाढ लक्षात घेऊन सरकार ‘इंडिया न्यू व्हेईकल असेसमेंट प्रोग्राम’ राबवत आहे. याअंतर्गत देशात विकल्या जाणाऱ्या कारचे (vehicle) सुरक्षेच्या आधारावर मूल्यांकन केले जाईल. हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. ज्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. ही चिंतेची बाब असून, सरकार परिस्थिती सुधारण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. आता सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये सहा एअर बॅग बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे, असेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com